gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील प्रा. रामा अच्युता सरतापे यांना पीएच. डी. पदवी प्रदान

prof-sartapeगोगटे जोगळेकर महाविद्यालयात अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करणारे प्रा. रामा अच्युता सरतापे यांना नुकतीच पीएच. डी. पदवी जाहीर झाली.

प्रा. रामा अच्युता सरतापे यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. बी. ककडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्राप्त केली. “स्टडी ऑफ बीपीएल फॅमिलीज स्टेटस अॅड इम्पॅक्ट ऑफ गव्हर्न्मेट वेल्फेअर स्कीम: ए केसस्टडी ऑफ रत्नागिरी डिस्ट्रीक्ट” या विषयावर संशोधन करून त्यांनी आपला प्रबंध विद्यापीठाला सादर केला.

महाविद्यालयामद्धे प्रा. सरतापे विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक कार्याकरिता नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या ‘अविष्कार’ या संधोधन उपक्रमात नैपुण्य प्राप्त केले आहे. तसेच अनेक शासकीय पातळीवारीअल असलेल्या योजना रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून मिळवून दिल्या आहेत. याबरोबरच मुंबई विद्यापीठाचे दोन शोधनिबंध प्रकल्प पूर्ण करून सादर केले आहेत. त्यांचे अनेक संशोधनपार लेख आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर असलेल्या जर्नलमधून प्रसिद्ध झाले असून अनेक शोध निबंधांचे वेगवेळ्या परिसंवाद व परिषदेत वाचन केले आहेत.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)