gogate-college
Poster Presentation Competition

गणित विषयावर आधारित पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सुयश

विलिंगग्डन महाविद्यालय, सांगली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या गणित विषयावर आधारित पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील ओंकार दीपक जावडेकर आणि विराज राघोबा धुरी यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यांनी ‘रिमान हायपोथेसिस अॅड झिटा फंक्शन’ विषयावर सादरीकरण केले. स्पर्धेत राज्यभरातील ३० संघ सहभागी झाले होते. विजेत्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम असे परितोषिक देऊन गौरविण्यात आले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि गणित विभाग प्रमुख व मार्गदर्शक डॉ. राजीव सप्रे यांनी यशस्वी विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)