gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्लेसमेंट सेल आणि व्हिजन प्लेसमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल आणि व्हिजन प्लेसमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ मार्च २०१७ रोजी आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची मुलाखतीकरिता निवड झाली आहे. सदर निवड हि लोटे, चिपळूण येथील गरुडा केमिकल या कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल विभागाकरिता करण्यात आली आहे. अंतिम मुलाखतीनंतर त्यांना लवकरच नियुक्त करण्यात येणार आहे. महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेलच्या या उपक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या मुलाखती यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातर्फे डॉ. उमेश संकपाळ, प्रा. रुपेश सावंत, प्रा. पंकज घाटे यांनी काम पहिले तर व्हिजन प्लेसमेंटतर्फे सौ. मंजिरी चिपळूणकर या उपस्थित होत्या.

Comments are closed.
 
  • 2017 (70)
  • 2016 (37)