gogate-college

पर्यावरण संस्था रत्नागिरी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेचर वॉकचे आयोजन

पावसाळ्यात कोकणातील सड्यांवर आढळणारी विविधरंगी फुले पाहण्यासाठी तसेच त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पर्यावरण संस्था, रत्नागिरी आणि वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ऑगस्ट २०१७ रोजी फणसोप सडा येथे ‘नेचर वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील सड्यांवरील विशीष्टयपूर्ण वनस्पतींचा परिचय या निसर्ग सहलींचे दरम्यान करून देण्यात येणार आहे.

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, निसर्गप्रेमी नागरिकांनी या सहलीत सहभाग घ्यावा. या सहलीत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी फणसोप हायस्कूल बस थांबा, फणसोप येथे दि. १३ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ०८.३० वाजता उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी प्रा. शरद आपटे, वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (भ्रमणध्वनी ९४२३२९२०९५) यांचेशी संपर्क साधावा; असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)