gogate-college

आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे

कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालीन विद्यार्थ्याकरिता

आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

 

स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय तर्फे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालीन विद्यार्थ्याकरिता आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन दि. १५ डिसेंबर २०१६ रोजी करण्यात आले आहे.

या स्पर्धेकरिता वरिष्ठ महाविद्यालायाकरिता (१) समानता मानव धर्माचा नसेल भक्कम पाया तरी इमारत यंत्र युगाची उठेल मनुजा खाया (२) प्रसार माध्यमांतील नीतिमूल्यांचा ऱ्हास (३) सर्जिकल स्ट्राईक: शिवबांचा गनिमीकावा आणि कनिष्ठ महाविद्यालायाकरिता (१) यंत्र-युगे घोर मजला आकांत बळावला प्रांत दुर्जनांचा स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा शोध व्यर्थ तो प्रबोध शास्त्रज्ञांचा (२) पर्यावरण आणि माणूस (३) मोबाईल- जग जवळ आले, माणसे दुरावली; असे विषय देण्यात आले आहेत.

स्पर्धेकरिता संपर्क- प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर (फोन: ०२३५२-२२१३११, २२२९९९) आणि स्पर्धासंयोजक प्रा. मकरंद दामले मोबा. ९४२११४३३४३, ७७४४८१४४५४;इमेल: makaranddamle75@gmail.com यांचेशी करावा; स्पर्धेकरिता नाव नोंदणीची अंतिम तारीख १० डिसेंबर २०१६ आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)