gogate-college
mumbai-university-aethaletiksa-games-2016

मुंबई विद्यापीठ अॅथलॅटीक्स स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अॅथलॅटीक्स स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थांमध्ये किरण मांडवकर, दीपराज आंबेकर, सुर्यकांत बावकर, निलेश मालप, कल्पेश बोटके, संतोष शेलार, रोहन मांडवकर, संकेत मोहिते, योगेश कांबळे तर मुलींमध्ये आरती कांबळे, तन्वी कांबळे, धनश्री लाड, ऐश्वर्या सावंत, अनिता दुर्गवळी, नम्रता पवार, दिव्या भोरे, सोनिया भोसले यांचा समावेश होता.

स्पर्धेतील महिलांच्या रिले प्रकारात ४ x १०० व ४ x ४०० सुवर्ण पदक, १५०० मीटर धावणे सुवर्ण पदक, ५००० मीटर धावणे कास्य पदक तर पुरुषांच्या रिले प्रकारात ४ x ४०० कास्य पदक, ४ x १०० धावणे मध्ये चौथा क्रमांक, सर्वसाधारण सुयश संपादन करत मुंबई विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेतील संयुक्त विजेतेपदाचा मान गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे.

विजयी संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन आणि प्रा. ओंकार बने, प्रा. चंद्रकांत घवाळी, सौ. लीना घाडीगावकर, पंकज चवंडे तसेच रत्नागिरी जिल्हा अॅथलॅटीक्स असोसीएशनचे सेक्रेटरी श्री. संदीप तावडे यांचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेतील पदक विजेत्या व यशस्वी खेळाडूंचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यवाह अॅड. प्राची जोशी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.