gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संशोधनासाठी उपयुक्त आधुनिक विश्लेषणात्मक उपकरण

विश्वअनुदान आयोगाकडून मिळालेल्या निधीमधून नुकतेच शिमाजू (मेड इन जपान) या कंपनीचे हाय पफॉरर्मन्स लिक़्विड क्रोमॅटोग्राफी (एच.पी.एल.सी.) हे प्रिप्रेटीव्ह कॅटॅगिरीचे उपकरण गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने प्राप्त केले आहे. हे एक आधुनिक विश्लेषणात्मक उपकरण असून जे संयुगांमधून रासायनिक घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि त्याचे मापन करण्यासाठी वापरले जाते. प्राध्यापकांच्या संशोधनाबरोबरच विद्यार्थ्यांनाही या उपकरणामुळे त्यांच्या अभ्यासक्रमातील प्रायोगिक काम अधिक माहितीसह करणे या उपकरणामुळे शक्य होणार आहे.

रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इतर संशोधन कार्यासाठी खूपच उपयुक्त ठरणारे आहे. हे आधुनिक उपकरण महाविद्यालयाच्या नियोजित ‘बायोफार्मास्युटिकल लॅबोरेटरीचा’ भाग आहे. आपले कोकण हे जैवविविधतेचे भांडार आहे. अनेक औषधी वनस्पती, समुद्रीशैवाळ यांवर महाविद्यालयामध्ये सध्या संशोधन सुरु आहे. वनस्पतीपासून मिळणाऱ्या अनेक औषधांसाठी सध्या मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने सदरचे उपकरण फायटोकेमिकल्स, रासायनिक संयुगे आणि सूक्ष्मजीव यांपासून मिळणारे पदार्थ यांवरील संशोधनाकरिता उपयुक्त ठरेल.

या उपकरणाच्या वापराच्या सुविधा कोकणातील अन्य महाविद्यालये तसेच सामंजस्य करारांतर्गत सहभागी असणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.

Comments are closed.