gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. च्या प्रवेशाबाबत

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक पदव्युत्तर विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. भाग-१ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे. २५ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या कला शाखेमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये तर समाजशास्त्र व अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रांमध्ये मुंबई विद्यापीठाचे एम. ए. करीता अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या सर्व विषयांचे अभ्यासक्रम संपूर्ण (८ पेपर्स) स्वरूपाचे असून ते नियमित, सेमिस्टर आणि अंतर्गत अधिक बाह्यमूल्यमापन (४० अधिक ६० गुण) पद्धतीचे आहेत. विज्ञान, वाणिज्य, शेती विधी, अभियांत्रीकी, वैद्यकशास्त्र अशा अन्य विद्याशाखांचे पदवीधर किंवा कलाशाखेच्याच उपरोक्त विषयांपेक्षा वेगळे विषय घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील येथे एम.ए. करीता प्रवेश घेऊ शकतात.
मात्र त्याकरिता ते घेऊ इच्छित असलेल्या विषयाची एक सामान्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सादर चाचणी सोमवार दि. २३ जुलै २०१८ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे संपन्न होईल. यासंदर्भातील अर्ज दि. २० जुलै २०१८ पर्यंत श्रीमती लाला यांच्याकडे द्यावेत अथवा अधिक माहितीकरिता श्रीमती लाला यांचेशी संपर्क साधावा, असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2018 (135)
  • 2017 (184)
  • 2016 (37)