gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. अनिकेत सुळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Dr. Aniket Suleमुंबई विद्यापीठाच्या दैदिप्यमान वाटचालीस १६० वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या प्रेरणेतून करण्यात आले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची या व्याख्यान मालेसाठी निवड झाली असून होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलअभ्यासक डॉ. अनिकेत सुळे हे “खगोलशास्त्र: भारतीय इतिहासाकडे पाहण्याचे नवे माध्यम” या विषयावर आपले विचार दि. ५ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात मांडणार आहेत.

डॉ. अनिकेत सुळे हे सध्या इंडियन नॅशनल अॅस्ट्रोनॉमी सेलची धुरा सांभाळत असून ‘इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑन अॅस्ट्रोनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स’चे मुख्य सचिव आहेत. भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा खगोलशास्त्रीय दृष्टीकोन लक्षात घेऊन खगोलशास्त्राचे महत्व व भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती ते विषद करतील. सदर व्याख्यान सर्वांसाठी खुले असून खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.