gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोकण प्रज्ञा शोध अंतिम निवड परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ दि. ५ मार्च २०१७ रोजी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे कोकणातील प्रज्ञावान विद्यार्थांचा शोध घेण्यास कटिबद्ध असलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षेची अंतिम निवड परीक्षा रविवार दि. ०५ मार्च २०१७ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मुख्य इमारत या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचा मुख्य पारितोषिक वितरण समारंभ याच दिवशी दुपारी ०३.३० या वेळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्याकरता प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून श्री. मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधिक्षक, रत्नागिरी हे उपस्थित राहणार आहेत.

या अंतिम निवड परीक्षेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून तालुकानिहाय निवड झालेले पहिले २ विद्यार्थी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील २६ विद्यार्थी असे ६८ विद्यार्थी या अंतिम निवड परीक्षेकरिता प्रविष्ठ होणार आहेत. मोठ्या स्पर्धा परीक्षांचे निकष असतात त्याप्रमाणे सदर निवड परीक्षा होणार असून या परीक्षेद्वारे कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६-१७ मधील एक प्रज्ञावान विद्यार्थी, एक प्रज्ञावान विद्यार्थिनी आणि एक मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थी अशी निवड केली जाणार आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

अंतिम निवड परीक्षेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी दि. ०५ मार्च २०१७ रोजी सकाळी ०८.३० वाजता उपस्थित रहावे तसेच या मुख्य परितोषिक वितरण समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.