gogate-college-autonomous-logo

कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७ दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी

कोकणातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कटिबद्ध असलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१७ करिता यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातून विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. विद्यमान वर्षी रविवार दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी तीनही जिल्ह्याकरिता सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू अशी तीन माध्यमे असून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे माध्यम, परीक्षा क्रमांक, परीक्षा केंद्र इ. आवश्यक माहिती महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रायगड जिल्ह्यात पुढील परीक्षा केंद्रांवर कोकण प्रज्ञा शोध परीक्षा संपन्न होणार आहे. परांजपे विद्यामंदिर, महाड; न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा; ए. आय. उर्दू हायस्कूल, श्रीवर्धन; चिंतामणराव केळकर हायस्कूल, अलिबाग; के.व्ही.एस.व्ही.के. हायस्कूल, पनवेल.

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील परीक्षा केंद्रांवर कोकण प्रज्ञा शोध परीक्षा संपन्न होणार आहे. युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण; कै. गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय, सावर्डे, ता. चिपळूण; मिलिंद हायस्कूल, रामपूर, ता. चिपळूण; न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी, चिंचघरी, चिपळूण; ए.जी. हायस्कूल, दापोली; हाजवानी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड; श्रीदेव गोपाळकृष्ण मध्यमिक विद्यालय, गुहागर; न्यू इंग्लिश स्कूल, लांजा; जगन्नाथ पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे, ता. लांजा; नाटे नगर विद्यामंदिर, नाटे; एस. वाय. गोडबोले माध्यमिक विद्यामंदिर, केळ्ये-माजगाव; आर.बी. शिर्के प्रशाला, रत्नागिरी; महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर, हर्चेरी-उमरे; जीजीपिएस, रत्नागिरी; न्यू इंग्लिश स्कूल, साडवली, देवरुख; महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई, ता. संगमेश्वर; कै. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली, देवरुख.

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील परीक्षा केंद्रांवर कोकण प्रज्ञा शोध परीक्षा संपन्न होणार आहे. माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी-सागवे, ता. कणकवली; विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली; न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी, ता. दोडामार्ग; शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, पणदूर तिठा, ता. कुडाळ; न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे; कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावन्त्वारी; श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव, ता. कुडाळ; वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला; आरोंदा हायस्कूल, आरोंदा, ता. सावंतवाडी; भंडारी हायस्कूल, मालवण; सेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड; गुरुवर्य ए.व्ही. बावडेकर विद्यालय, वाडा, ता. देवगड.

रविवार दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी आयोजित केलेल्या परीक्षेबाबत संबंधित शाळांना, केंद्रसंचालकांना आणि तालुका समन्वयकांना माध्यम, परीक्षा क्रमांक, परीक्षेचे केंद्र आणि ओ.एम.आर. उत्तरपत्रिकांबाबत सविस्तर माहिती कळविण्यात आली आहे. अधिक माहितीकरीता परीक्षा समन्वयक प्रा. दिलीप शिंगाडे, ८०८७८६१८१७ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा; असे कोकण प्रज्ञा शोध परीक्षा संचालक आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.