gogate-college

कोंकण प्रज्ञा शोध परीक्षा दि.०८ जानेवारी २०१७ रोजी

रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालायामार्फत प्रतिवर्षी घेण्यात येणारी कोंकण प्रज्ञाशोध परिक्षा रविवार दि ८ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. गेली २१ वर्षे इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी हि परिक्षा घेतली जाते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तीन जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर हि परिक्षा घेतली जाणार असून शाळानिहाय, केंद्रनिहाय विद्यार्थी यादी व प्रवेशपत्रे दि. २५ डिसेंबर २०१६ पासून महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, अथवा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी किंवा ८०८७८६१८१७ (प्रा. दिलीप शिंगाडे), ९४२११३९२९६   (प्रा. विवेक भिडे) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2017 (158)
  • 2016 (37)