gogate-college
jaydeep-paranjape-gogate-college

मुंबई विद्यापीठ संघातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जयदीप परांजपे याला सुवर्णपदक

१५ व्या आंतरविद्यापीठ राज्य स्तरीय ‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सव नुकताच मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे संपन्न झाला. राज्यातील १८ विद्यापीठांनी या सांस्कृतिक महोत्सवात आपला सहभाग नोंदवला.

मुंबई विद्यापीठ संघातील आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील जयदीप परांजपे याला विद्यापीठाचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सांस्कृतिक समन्वयक प्रा. निलेश सावे आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ संघ तयार केला जातो. ‘इंद्रधनुष्य’ या सांस्कृतिक महोत्सवात जयदीप याने ‘फोक ऑर्केस्ट्रा’ कलाप्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. महाविद्यालयातर्फे संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. निधी पटवर्धन, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

जयदीप याच्या सुवर्ण कामगिरीबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सांस्कृतिक विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. आनंद आंबेकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)