gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन संपन्न

NSS Camp

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन दि. २५ डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य श्री. उदयजी बने यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सतीशजी शेवडे होते. या कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, निरूळ ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ. श्रेयसी बने, उपसरपंच श्री. किशोर पांचाळ, उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये आणि निरूळ गावातील अनेक ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी प्रास्ताविक करताना शिबिराविषयी सविस्तर माहिती दिली.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला. केंद्र आणि राज्य शासनाने सुरु केलेल्या योजना समाजात राबविण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या सामाजिक योगदानाची माहिती उपस्थितांना सविस्तरपणे दिली.

श्री. उदयजी बने यांनी देशासमोरील आणि युवकांची भूमिका या विषयावर उपस्थित युवावर्गाशी संवाद साधला तर श्री. सतीशजी शेवडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमधून नेतृत्व ससे घडते याचे अनेक दाखले विद्यार्थ्यांना दिले.

आठ दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिराकरिता अनेक महाविद्यालयीन शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले

Comments are closed.