gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता ‘कॅम्पस ड्राईव्ह’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल’तर्फे आणि एन.आय.आय.टी., मुंबई यांच्या सहकार्याने ‘आय.सी.आय.सी.आय.’ या खाजगी क्षेत्रातील नामवंत बँकेकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन दि. २९ व ३० जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले आहे. सिनिअर ऑफिसर करिता पदे भरण्यात येणार असून उमेदवार कोणत्याही शाखेचे पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले, पदवीच्या अंतिम वर्षाला किंवा पदव्युत्तर भाग-१ व २ ला असलेले विदयार्थी सदर ‘कॅम्पस ड्राईव्ह’ करिता उपस्थित राहू शकतात. याशिवाय गोगटे जोगळेकर महाविद्यालयाबरोबरच इतर महाविद्यालयांचे विद्यार्थीसुद्धा यावेळी उपस्थित राहू शकतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली मूळ प्रमाणपत्र, फोटो, बायोडेटासहित दि. २९ रोजी सकाळी ११.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे उपस्थित राहावे.

या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत (मोबा. ९४२११४२५२९) यांचेशी संपर्क साधावा.

Comments are closed.