gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालायात झेप अंतर्गत कराओके गायन स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालायात झेप या वार्षिक युवा महोत्सवामद्धे कराओके गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे आणि प्रा. आनंद आंबेकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण श्री. अभिजित भट यांनी केले. स्पर्धेत बरीन आवटे, शौनक खरे आणि सायली मुळये यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. सूत्रसंचालन बरीन आवटे आणि मुफर्राह काझी यांनी केले. तृतीय वर्ष विज्ञान विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रा. अनुजा घारपुरे यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर प्रथम वर्ष विज्ञान विभागाने आयोजित केलेल्या फनी गेम्स स्पर्धा संपन्न झाल्या. दोन्ही कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)