gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. प्रज्ञा भिडे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर श्रीम. प्रज्ञा भिडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रेरणादायी असे प्रसंग कथन करून गुरुचे महत्व वर्णन केले. यानंतर पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल रसायनशास्त्र विभागातील प्रा. अपर्णा कुलकर्णी यांचे श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ‘ज्ञान कधीही बदलत नाही, विधान बदलणारे आहे’ असे म्हणून उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना संशोधन करण्याचे, देशाची मान उंच होईल असे कार्य करण्याचे आवाहन केले.

यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व प्राध्यापकांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. या कार्याक्रमचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. आरती पोटफोडे यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)