gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २८ सप्टेंबर रोजी जॉब फेअर चे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ सप्टेंबर २०१७ रोजी ‘जॉब फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यामद्धे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता इ. च्या बाबतीत अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे विविध खाजगी बँका तसेच खाजगी आस्थापनांमधील विविध प्रकारच्या जागांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न होणार आहेत. यावेळी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्वरित नेमणुका केल्या जातील.

या जॉब फेअरमध्ये महाविद्यालयातून पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे अंतिम वर्षामद्धे शिकत असलेलेले आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा सहभागी होऊ शकतात. ही संधी महाविद्यालयाबाहेरील उमेदवारांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली मूळ कागदपत्रे, बायोडेटा इ. सहित महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये रूम नं. २२ (राधाबाई शेट्ये सभागृह) या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रा. रुपेश सावंत ९४२११४२५२९ आणि डॉ. उमेश संकपाळ ९७६४४१४६१२ यांचेशी संपर्क साधावा; असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि जिल्हा कार्यालयाचे प्र. सहाय्यक संचालक श्री. ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

Comments are closed.