gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय मराठी विज्ञान परिषदेच्यावतीने विविध विषयांवर विज्ञानरंजन स्पर्धांचे आयोजन

प्रतिवर्षाप्रमाणे मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी यांचेतर्फे विज्ञान रंजन तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. विज्ञान रंजन स्पर्धेकरिता विज्ञान कथा पाठविण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. सर्व कथा कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद भवन, वि. ना. पुरव मार्ग, शिव, चुनाभट्टी (पूर्व), मुंबई- ४०० ०२२ यांचेकडे पाठवायच्या आहेत. सदर स्पर्धेकरिता शब्द संख्या किमान १००० असावी. ए-४ आकाराच्या कागदावर एकाच बाजूस स्वहस्ताक्षरात लिहिणे अव्याश्यक आहे. सदर कथा स्वतःची असल्याचे प्रतिज्ञापत्र कथेसोबत देणे अनिवार्य आहे. कथेसोबत लेखकाने आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नं. भ्रमणध्वनी, ई-मेल द्यावा. पहिल्या दोन सुयोग्य कथांकारिता रु. २००० व रु. १५०० इतक्या रकमेची परितोषिके दिली जातील.

वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा २०१७ करिता विद्यार्थी गट विषय ‘घनकचरा व्यस्थापन’ तसेच निबंध स्पर्धा २०१७ करिता खुला गट विषय ‘मानव व वन्यप्राणी संघर्ष’ असा आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आपले निबंध दि. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत डॉ. ह. शा. भानुशाली, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग, कौशल्य, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पथ, ठाणे- ४००६०१. यांचेकडे पाठवावीत.

प्रत्येक गटासाठी पहिल्या व दुसऱ्या निबंधाकरिता रु. ५०० व रु. २५० अशी पारितोषिके दिली जातील. या स्पर्धेकरिता शब्दसंख्या १५०० ते २००० असावी. ए-४ आकाराच्या कागदावर एकाच बाजूला स्वहस्ताक्षरात लिखाण असावे. लेखकाने आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच मोबाईल नंबर नमूद करावा. अधिक माहितीकरिता डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, समन्वयक, मराठी विज्ञान परिषद, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. भ्रमणध्वनी ९४२२४३२५६३ यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या विस्तृत माहितीसाठी मराठी विज्ञान परिषद भवन, वि. ना. पुरव मार्ग, शिव, चुनाभट्टी (पूर्व), मुंबई- २२; दुरध्वनी २४०५४७१४/ २४०५७२६८ यांचेशी संपर्क साधावा असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर कळवितात.

Comments are closed.