gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रोजगाराभिमुख कौशल्य विकसन सेमिनार दि. १५ मार्च रोजी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा करिअर गाइडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि पुणे येथील ‘बिझी कॅटॅलिस्ट’ या नामवंत संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख गुण व कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने गुरुवार दि. २० मार्च २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता राधाबाई शेट्ये सभागृह येथे मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारकरिता महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि तृतीय वर्ष पदवी आणि पदव्युत्तर भाग-२ मधील कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.

अधिक माहितीकरिता प्रा. रुपेश सावंत ९४२११४२५२९ आणि डॉ. उमेश संकपाळ ९७६४४१४६१२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (36)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)