gogate-college
Oct.5,botany.chaukul news

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या जैवविविधताविषयक कार्यशाळेत सहभाग

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विषय शिकणा-या द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या श्रद्धा गावणकर आणि आरती पाध्ये या विद्यार्थिनींनी ‘पश्चिम घाटातील लॅटेराईट पठारावरील जैवविविधता’ या विषयावरील कार्यशाळेत सहभाग घेतला.

दि. ११ व १२ सप्टेंबर रोजी , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ (आंबोली) येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या आणि सध्या गोवा विद्यापीठात पी.एच.डी. करणा-या ऋतुजा कोलते यांच्या ‘रुफोर्ड स्मॉल ग्रँट’ या योजनेंतर्गत निधी प्राप्त झालेल्या प्रकल्पाचा भाग म्हणून, गोवा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ऋतुजा कोलते यांच्या, ‘लोकसहभागातून चौकुळ येथील या लॅटराईट पठारावरील जैवविविधतेचे संवर्धन’ (इन-सीटू कन्झर्वेशन ऑफ इंडेमिक प्लांट्स ऑफ चौकुळ, लॅटेराईट प्लॅटू ऑफ नॉर्थ वेस्टर्न घाट्स ऑफ महाराष्ट्र) या प्रकल्पा अंतर्गत, तज्ञ व्यक्तींची व्याख्याने  आणि क्षेत्रभेटी यांच्या माध्यमातून  पश्चिम घाटातील लॅटेराईट पठारावरील दुर्मिळ वनस्पती प्रजातींची ओळख आणि त्यांचे संवर्धन याविषयीचे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)