gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय झेप सांस्कृतिक महोत्सव २०१७ भाटवडेकर चषक स्कीट स्पर्धेत वास्तव सर्वप्रथम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सवात झालेल्या नाटुकले स्पर्धेत प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील कलाविष्कार ग्रुपच्या ‘वास्तव’ या नाटुकल्याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत भाटवडेकर चषक पटकावला. स्पर्धेत कलाविष्कार ग्रुप प्राथम क्रमांक, नटराज ग्रुप द्वितीय क्रमांक आणि प्रारंभ ग्रुप तृतीय क्रमांक प्राप्त केला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. शाहू मधाळे, प्रा. तुलसीदास रोकडे, विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय सावंत उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण श्री. मनोज भिसे आणि श्री. प्रथमेश भाटकर यांनी केले. प्रथम वर्ष वाणिज्य शाखेने स्पर्धेचे संयोजन केले. सूत्रसंचालन सुयोग रानडे आणि आभारप्रदर्शन वेदिका रानडे यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)