gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाचा कासव संवर्धनासाठी प्रयत्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरीचे निसर्ग मंडळ गेली कित्येक वर्ष पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत आहे. गावखडी किनाऱ्यावर सापडलेल्या कासवांच्या अंड्याचे संवर्धन करण्याच्या हेतूने कार्यरत असलेल्या गावकऱ्यांना साथ देण्यासाठी हेच निसर्ग मंडळ आता सरसावले आहे.

सरस्वती विद्यामंदिर, गावखडी आणि निसर्ग मंडळ, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला.

कासवांच्या अंड्याची वाढती चोरी लक्षात घेता, मुलांकडून जनजागृती करण्याच्या हेतूने शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले गेले. डॉ. दप्तारकर, देवगड कॉलेज यांनी यावेळी कासवाच्या विविध जातींची माहिती करून दिली, त्यांना आवश्यक अधिवासाची तसेच एकून पर्यावरणाची माहिती करून दिली.

या प्रसंगी विभागीय वनाधिकारी श्री जगताप सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कासव संवर्धनासाठी आमच्याही पेक्षा तुम्ही मुलं पुढे येण्याची गरज आहे, असा विश्वास दाखवत, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

एकून १०० विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग दर्शवला सदर प्रसंगी निसर्ग मंडळाचे समन्वयक महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी, माजी प्राध्यापक डॉ. जी. एस. कुलकर्णी, अॅड. संध्या सुखटणकर, सौ. कुलकर्णी, सौ. अतिका राजवाडकर, श्री.रानडे, श्री. डिंगणकर, श्री रिसबूड, तसेच विभागीय वनाधिकारी श्री. जगताप यांची विशेष उपस्थिती लाभली.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)