gogate-college

महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करणे आणि व्यक्तिमत्व विकास साधणे महत्त्वाचे – प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याकरिता उपस्थित उमेदवार आणि विद्यार्थ्यांना उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर बोलत होते. त्यांनी रोजगाराला आवश्यक कौशल्ये आणि शिक्षण यांचा समन्वय साधण्याचे आवाहन उपस्थित तरुणांना केले. सदर मेळावा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच संपन्न झाला.

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बाहेरील मिळून ३०० पेक्षा अधिक उमेदवार याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरीचे प्र. सहायक संचालक श्री. जी. पी. बिटोडे यांनी मेळाव्याचा उद्देश विषद करताना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी शोधण्याबरोबरच सरकारच्या उद्योजकता विकासासाठी असलेल्या विविध वेबसाईट व योजना इ. माहिती दिली. मार्गदर्शन सत्रामद्धे विविध खाजगी आस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध रोजगार संधींची सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या. आय.सी.आय.सी.आय., एच.डी.एफ.सी., डी.एच.एफ.एल., कोटक महिंद्रा इ. खाजगी क्षेत्रातील बँका, तसेच गद्रे मरीन एक्स्पोर्ट, सी.फार्म. इ. आस्थापनातील विविध जागाकरिता २५० पेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या या रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन जिल्हा रोजगार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. रुपेश सावंत, डॉ. उमेश संकपाळ व कर्मचारी यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)