gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुंतवणूक मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या ‘प्लानिंग फोरम प्रोग्रेसिव्ह कमर्शियल कमिटी’च्यावतीने गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक गुंतवणूकीविषयी जागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमात उपस्थितांना एन.एस.डी.एल. चे उपाध्यक्ष श्री. मनोज साठे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी डीमॅट खाते, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट याविषयी सविस्तर माहिती दिली. यातील गुंतवणूक आणि पारंपारिक गुंतवणूकितील फायदे आणि तोटे आणि जोखीम यांचा आलेख मांडला. त्यांनी आभासी चलन याविषयी माहिती दिली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सोप्या प्रकारे उत्तरे दिली. प्रा. प्रसाद दामले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी आभारप्रदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभातील सुमारे १५० विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.