gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन – कोकणातील उर्दू भाषेच्या विकासावर होणार विचारमंथन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकणातील उर्दू विकासाच्या दिशा’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी सदर चर्चासत्र संपन्न होत आहे.

सदर चर्चासत्राच्या उद्घाटन सओहोळ्याकरिता मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, उद्घाटक म्हणून डोहा, कतार येथील हसन अब्दुलकरीम चौघुले, ख्यातनाम कवी आणि पत्रकार शमीम तारिक आणि कुवैत येथील ख्यातनाम समीक्षक श्रीम. मेमुना अली चौघुले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटक सोहोळ्यानंतर सकाळी ११.३० वाजता डॉ. इलियास सिद्दीकी (कवी आणि लेखक, मालेगाव) यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राच्या पहिल्या सत्रास प्रारंभ होईल. यामद्धे नजीर फतेपुरी, डॉ. सादिक नबाब सहर, एम. मुबीन, डॉ. अझीम राही, डॉ. मोहंमद साहीद पठाण, डॉ. राफिया सलीम, डॉ. बिल्किस बानो, डॉ. साजिद आली काद्री, तसनीफ अझाझ, डॉ. तरन्नुम आदी देशभरातून येणारे मान्यवर आपल्या शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत.

यानंतर दुपार सत्रात ख्यातनाम कवी आणि लेखक डॉ. राही फिदाई यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या चर्चासत्रास प्रारंभ होईल. यामद्धे डॉ. मोहंमद हक साबेली, डॉ. अब्दुल अझीझ सुहेल, डॉ. अब्दुल कडूस, डॉ. सीमा नाहीद, डॉ. शाहीना परवेझ सिद्दीकी, मोहंमद याह्या, अंसार अहमद दरवेश, मोहंमद खुक्तार, शाझिया बानो आदी देशभरातून येणारे मान्यवर आपल्या शोधनिबंधाचे वाचन करतील.

या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप नागपूर येथील प्रसिद्ध कवी आणि लेखक डॉ. अब्दुल रहीम नष्तर, इस्माईल युसुफ महाविद्यालयाचे उर्दू विभागप्रमुख डॉ. अफसर फारुकी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे, डॉ. सादिया नवाब, श्री. इस्माईल युसुफ सोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू विभागप्रमुख प्रा. दानिश गनी प्रयत्न करत आहेत. या चर्चासत्राला उर्दूचे जाणकार आणि रसिक यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)