gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे कोल्हापूरस्थित व्हिजन प्लेसमेंट यांच्या सहकार्याने दि. ३ मार्च २०१७ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या मुलाखती चिपळूण, लोटे एम.आय.डी.सी. येथील नव्याने सुरु होणाऱ्या नामांकित केमिकल कंपनीसाठी घेण्यात येणार आहेत. विविध आस्थापनंकारिता या मुलाखती होत असून २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात पदवी व पदव्युत्तर परीक्षा देणारे रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

मुलाखतीची वेळ सकाळी १०.०० अशी असून सदर मुलाखती महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत ज. शं. केळकर सभागृह येथे संपन्न होणार आहेत. सदर इच्छुक विद्यार्थांनी आवश्यक प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)