gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कला शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता नेट- सेट मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

gjc-net-set-workshop

विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवरच नेट-सेट परीक्षांसंदर्भात माहिती व्हावी आणि या परीक्षा देण्याकरिता त्यांना प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये, रत्नागिरी शहरातील महाविद्यालयांमधील कलाशाखेत पदवी आणि पदव्युत्तर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी या कार्यशाळेकरिता समन्वयक म्हणून काम पहिले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी तसेच शहरातील इतर महाविद्यालयातील काही विद्यार्थी मिळून एकूण १३३ जणांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात भूगोल विभागाचे प्रा. विनायक गावडे यांनी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांचे स्वरूप, परीक्षांची कार्यपद्धती, परीक्षा देण्याकरिता आवश्यक पात्रता, परीक्षा उत्तीर्ण होण्यासंबंधीचे नियम, परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतरच्या संधी याविषयीची सखोल माहिती दिली. त्यानंतर भूगोल विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी दोन्ही परीक्षांच्या पेपर क्र. १ चे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील विविध घटकांनुसार अभ्यासाची तंत्रे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुस-या सत्रात प्रा. वासुदेव आठल्ये (इंग्रजी), प्रा. डॉ. दिनेश माश्रणकर (अर्थशास्त्र), प्रा. डॉ. कल्पना आठल्ये (संस्कृत), प्रा. बीना कळंबटे (मानसशास्त्र), प्रा. श्रीवल्लभ साठे (भुगोल), प्रा. पंकज घाटे (इतिहास), प्रा. सायली पिलणकर (मराठी), प्रा. कृष्णात खांडेकर (हिंदी), प्रा. मधुरा आठवले- दाते (इंग्रजी), प्रा. सचिन सनगरे (समाजशास्त्र), प्रा. निलेश पाटील (राज्यशास्त्र), प्रा. दानिश गनी (उर्दू) यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विषयनिहाय पेपर क्र. २ आणि ३ संदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून नेट आणि सेट या परीक्षांचे स्वरूप समजून घेण्यास, परीक्षेविषयीचे गैरसमज आणि भिती दूर होण्यास, परीक्षांचे अभ्यासतंत्र समजून घेण्यास मदत झाली, जोमाने तयारी करून परीक्षेला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली असे मनोगत व्यक्त केले.

gjc-net-set-workshop
gjc-net-set-workshop
Comments are closed.