gogate-college
ncc-department

गोगटे जोगळेकर महाविद्यालय एन.सी.सी स्वच्छता पंधरवडयात सहभागी

दि. १५ सप्टेंबर रोजी, २-महराष्ट्र नेव्हल युनिट एन.सी.सी. यांच्या सूचनेनुसार, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या नेव्हल एन. सी. सी विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र उद्यानात स्वछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महराष्ट्र नेव्हल एन.सी.सी युनिटचे कमांडीग अधिकारी कॅप्टन नीलकंठ खौंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कॅप्टन नीलकंठ खौंड यांनी उपस्थित कॅडेटसना मोलाचे मार्गदर्शन केले. या अभियानाला एम.सी.पी.ओ. श्री धतुरे, पी. आय. स्टाफ श्री यादव, लीडिंग सीमॅन श्री. अजित भोसले, नेव्हल एन.सी.सी लेफ्ट.दिलीप सरदेसाई हे उपस्थित होते. या स्वछता मोहिमेत नेव्हल एन.सी.सी युनिटच्या सर्व कॅडेटसने सिनियर कॅडेट्स व लेफ्टनंट प्रा. अरुण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्तपणे काम केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)