gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाच्या माध्यमातून ६० जनजागृतीपर फलकांची निर्मिती

निसर्ग मंडळ, गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि सरस्वती विद्यामंदिर, गावखडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणाऱ्या कासव संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून एकूण साठ जनजागृतीपर फलकांची निर्मिती करण्यात आली.

लहान मुलांनी तयार केलेल्या सदर फलकांचे प्रदर्शन गावातल्या वर्दळीच्या ठिकाणी करण्यात आले. मुलांना सर्वप्रथम महाविद्यालयाच्या बायोलॉजिकल सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी फलक बनवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थिनी अतिशय कल्पकतेने फलक बनवले. सदर फलक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागद, पेन्सिल, रबर, रंग महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाकडून पुरवण्यात आले.

या प्रसंगी निसर्ग मंडळाच्या सौ. अतिका राजवाडकर, सौ. मेघा मुकादम, आरती पोटफोडे, सरस्वती विद्यामंदिर, गावखडी या प्रशालेतील श्री. कुंभार उपस्थित होते. विद्यार्थ्यांना फलक निर्मिती करण्यासाठी योगिता कडवईकर, निखिल बंडबे, तेजल गुरव, स्नेहल मुंडेकर या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निसर्ग मंडळाचे समन्वयक डॉ. अरविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.