gogate-college-autonomous-logo

मराठी विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी आणि त्यावरील उपाय हा सध्या अतिशय कळीचा मुद्दा बनला आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून जैवप्लास्टिकची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. स्टार्चच्या विविध जैविक स्त्रोतापासून जैवप्लास्टिक तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी कु. तृप्ती जोशी आणि ओंकार पेढारकर यांनी केलेल्या जैवप्लास्टिक निर्मितीच्या प्रयत्नाला यावर्षी मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रथम क्रमांकासह १२०००/- रु.चे बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजीत राज्यस्तरीय विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धेत दिनांक २८ जानेवारी रोजी संपन्न झाली. राज्याच्या विविध महाविद्यालयातून आलेल्या संशोधन प्रकल्पातून अंतिम फेरीसाठी १० प्रकल्पाची निवड करण्यात आली होती. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे तीन प्रकल्प अंतिम फेरीत ‘पॉलिथीन बॅग्जना पर्याय म्हणून साबुदाणा आणि फ्लाच अॅश वापरून बायोप्लास्टिकची निर्मिती’ ह्या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाणे गौरविण्यात आले.

तृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर या विद्यार्थांनी दोन वर्ष या प्रकल्पावरती काम केले. स्टार्चचे विविध स्त्रोत तपासताना त्यांनी साबुदाण्याच्या उपयोग जैवप्लास्टिकसाठी करण्याची कल्पना सुचली. औष्णिक प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या फ्लाय अॅशचा वापर जैवप्लास्टिकला मजबुती देण्यासाठी करण्यात आला. अनेक प्रयत्ना अंती पॉलिथीन बॅग्जना पर्याय ठरू शकेल अशा जैवप्लास्टिकची फिल्म बनवण्यात त्यांना यश आले.

भाभा अणुसंशोधन केंद्र ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजि’ अशा नामांकित संस्थामधून आलेल्या परीक्षकांनी या विद्यार्थिनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यात अधिक सुधारणा सुचवल्या.

या प्रकल्पाला रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचा मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक समारंभात पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. एम.जी.गोरे आणि मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी शाखा समन्वयक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

Comments are closed.