gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

‘सर्वेपि सुखिन सन्तु’ अशी संस्कृती असणारा आपला भारत या भारताची संस्कृती आणि भारतीयशास्त्रे याविषयावर प्रा. इंदुमती काटदरे यांनी कालिदास व्याखानमालेमध्ये आपले विचार मांडले.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. २० व २१ फेबुवारी २०१८ या दिवशी ६१ व्या कालिदास स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त अहमदाबादमधील पुनरुत्थान विद्यापीठाच्या अध्यक्षा व कुलगुरू प्रा. इंदुमती काटदरे यांचे व्याखान झाले. या विषयावर बोलताना त्यांनी भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता विशद केली. भारतातील ज्ञानपरंपरा, तत्त्वज्ञान, धर्म विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. वेद, उपनिषदे, गीता यामधील तत्त्वज्ञान समजावून सांगितले मॉडर्न सायन्स आणि प्राचीन भारतीय शास्त्रे यातील भेद स्पष्ट केला. सध्याची समाजस्थिती, माणसाचे शारिरीक, मानसिक आरोग्य याबाबत सांगून पुढे शिक्षणामध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. भारतीय शास्त्रांचा शिक्षणात अंतर्भाव असणे गरजेचे आहे हे स्पष्ट केले. भारतीय संस्काराचे महत्व, आईवडिलांनी मुलांवर कसे, कोणते संस्कार केले पाहिजेत तसेच श्रुती, स्मृती यांतील तत्त्वज्ञान जाणणे महत्वाचे आहे हे विषद केले. भारतीय संस्कृती शिक्षण पद्धती पुढील पिढीला प्रेरणादायी आहे. संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारी आहे अध्यात्म विचारामुळे भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे हे स्पष्ट केले तसेच भारतीय शास्त्रांचा शिक्षणात अंतर्भाव होण्याबाबतचे आग्रही मत मांडले.

या कार्यक्रमादरम्यान या विषयासंबंधी उपस्थितांच्या शंका, त्यांच्या प्रश्नाचे प्रा. काटदरे यांनी निरसन केले. यावेळी संस्कृत विभागातील रेश्मा मालशे, स्वरदा महाबळ, समीक्षा पवार, तन्मय हर्डीकर, चेतना घाटे, प्राजक्ता मुसळे या गुणवंतांना पूर्व संस्कृत विभागप्रमुख तसेच संस्कृतप्रेमी, विद्वानांकडून दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी दोन दिवसाच्या व्याखानातील काही मुद्यावर आपली मते विशद करून, शक्य होईल तेव्हा नक्कीच या भारतीय शास्त्रांचा सध्याच्या शिक्षणात अंतर्भाव करू असे सांगितले. या कार्यक्रमाला उपप्राचार्या प्रा. चित्रा गोस्वामी, महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक वर्ग तसेच रत्नागिरीतील संस्कृतप्रेमी मंडळी उपस्थित होती.

संस्कृत विभागातील विद्यार्थीनिंनी गायिलेल्या सुमधुर ईशस्तवनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जयंत अभ्यंकर यांनी केले तर प्रास्ताविक, व्याख्याता परिचय तसेच आभारप्रदर्शन संस्कृतविभागप्रमुख प्रा. कल्पना आठल्ये यांनी केले. संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या शांतीमंत्राने या द्विदिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.