gogate-college
youth-festival-jayadeep-paranjape

गोगटे जोगळेकरचा जयदीप परांजपे ठरला मिस्टर युनिव्हर्सिटी किताबाचा मानकरी

मुंबई विद्यापीठाच्या ४९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवांतर्गत झालेल्या स्पर्धांमधून ‘मिस्टर युनिव्हर्सिटी’ हा मनाचा किताब गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जयदीप रामचंद्र परांजपे याने मिळविला. फोर्ट येथे झालेल्या दिमाखदार बक्षीस वितरण समारंभात त्याला गौरविण्यात आले. हा किताब पटकाविणारा तो गोगटे जोगळेकर महाविद्यालयासह कोकणातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

प्रतिवर्षी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागामार्फत आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. विविध सांस्कृतिक स्पर्धांसह सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांचा शोध घेन्यासाठी ‘जॅकपॉट’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यापीठाशी सलग्न असणाऱ्या २६८ महाविद्यालयांमधून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होत असते. विविध प्रकारच्या १४ फेऱ्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासल्या जातात. यामद्धे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, व्यवस्थापन, प्रश्नमंजुषा, पर्सनॅलिटी टेस्ट, बायोडेटा फेरी, वैद्यकीय तपासणी तसेच विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता तपासणारी ४०० गुणांची परीक्षा अशा विविध चाचण्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात. अत्यंत कठीण असलेल्या या स्पर्धेतून एकूण तीन क्रमांक काढले जातात. यातील प्रथम क्रमांक विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस अनुक्रमे ‘मिस्टर युनिवर्सिटी’ आणि ‘मिस युनिवर्सिटी’ किताबाने गौरविण्यात येते.

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवाच्या ५० वर्षांच्या इतिहासात जयदीप परांजपे या स्पर्धेत सहभागी होणारा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा तिसरा विद्यार्थी आणि विजेतेपद मिळविणारा कोकणातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशाबद्दल त्याला विचारले असता या यशामद्धे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तत्कालीन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. यास्मिन आवटे, इतिहास विभागप्रमुख डॉ. रमेश कांबळे, श्री. प्रसाद गवाणकर आणि एन.सी.सी. युनिट या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने नम्रपणे नमूद केले. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे, गणेश जोशी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि कर्मचारी वृंद यांच्या वेळोवेळी लाभलेल्या सहकार्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. हा मानाचा किताब मिळविल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)