gogate-college
gogate-jogalekar-college-costal-wetland-national-seminar

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोस्टल वेटलॅड ऑफ इंडिया विषयावरील राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालायात दि. १७ व १८ मार्च २०१८ या कालावधित करण्यात आलेल्या ‘कोस्टल वेटलॅड ऑफ इंडिया’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच संपन्न झाला.

या परिषदेचा पाणथळ परीसंस्थांचे महत्व, संवर्धन व विकास, मत्स्य व्यवस्थापन, पाणथळ जगांतील लुप्त पावत चाललेल्या प्रजातींचे पुनर्निर्माण तंत्र, कांदळवने तसेच पशु-पक्षी व वनस्पती प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन, जागरूकता असा उद्देश होता.

सदर परिषद गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मॅग्रुव्ह सेल, मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडिया व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. या परिषदेला मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. अरविंद उंटावले; मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव डॉ. विनोद धारगळकर; मस्त्य महाविद्यालय, शिरगाव येथील अधिष्ठाता डॉ. हुकुम सिंग; डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. प्रदीप मुकादम, डॉ. नागेश दप्तरदार, डॉ. स्वप्नजा मोहिते, डॉ. नंदिनी वाझ, डॉ. ठाकुरदेसाई, डॉ. निरंजना चव्हाण, अॅड. संध्या सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या तज्ज्ञानी मॅग्रुव्ह संवर्धन व विकास, जैवविविधतेतील खारफुटी व पाणथळ जागांचे महत्व, रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी कांदळवने तसेच समुद्री परिसंस्था आणि त्यातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण याविषयी उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला.

या राष्ट्रीय परिषेदेत सुमारे २४० विद्यार्थी आणि प्राध्यापक, मॅग्रुव्ह व जैवविविधता क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे विद्यार्थी आणि प्रतिनिधी; चौगुले महाविद्यालय, गोवा; सोमय्या महाविद्यालय, मुंबई; मस्त्य महाविद्यालय, शिरगाव; लांजा महाविद्यालय आणि महाविद्यालयाशी सलग्न असलेल्या एन.आय.ओ., गोवा; बी.एन.एच.एस., मुंबई सहभागी झाले होते.

परिषदेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या छायाचित्रण प्रदर्शन व भित्तीपत्रक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला तासेच मॅग्रुव्ह संवर्धन व विकास, जैवविविधता विषयक शोधनिबंधांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आशुतोष मुळ्ये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरविंद उंटावले तसेच डॉ. विनोद धारगळकर, डॉ. अरविंद कुलकर्णी याचीही उपस्थिती लाभली.

परिषद यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य आणि आयोजक सचिव डॉ. अरविंद कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

gogate-jogalekar-college-costal-wetland-national-seminar
gogate-jogalekar-college-costal-wetland-national-seminar
Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)