gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जात पडताळणी मार्गदर्शन शिबीर

gjc-cast-validity-workshop

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी यांचे मार्फत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात मंगळवार दिनांक २६/०९/२०१७ रोजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती/ विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग/ इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गातील जात पडताळणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. प्रमोद जाधव, उपायुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग तसेच जात पडताळणीचे काम पाहणारे महाविद्यालयाचे लिपिक श्री. सचिन पेडणेकर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये मा. श्री. प्रमोद जाधव, उपायुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी यांनी विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे महत्व, जात पडताळणी अर्ज कसा भरावा? अर्जासोबत कोणती कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करावीत? वंशावळ प्रतिज्ञापत्र कसे सादर करावे? इ. विषयी पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन च्या माध्यमातून माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतेवेळी आवश्यक जात पडताळणीचे महत्व पटवून दिले. लिपिक श्री. सचिन पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.

gjc-cast-validity-workshop
gjc-cast-validity-workshop
gjc-cast-validity-workshop
Comments are closed.