gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात “योग साप्ताह” साजरा

yoga-week-1

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात २१ जून या ‘जागतिक योग दिवसा’च्या निमित्ताने “योग साप्ताह”चे आयोजन करण्यात आले.

दि. २७ सप्टेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस ‘योग दिवस’ म्हणून साजरा करावा असे जगातील सर्व देशांना आवाहन केले. त्यामुळे दि. २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे हे तिसरे वर्ष असून त्या निमित्ताने महाविद्यालयाच्या राधाबाई सभागृहात दि. १२ जून २०१७ ते दि. १७ जून २०१७ या कालावधीत तीन सत्रांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक पाटील व इतर मान्यवर उपस्थीत होते. त्यांनी योगाचे जीवनातील महत्व या विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या वरिष्ठ महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या ६५० विद्यार्थ्यांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १२ वी च्या १२०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.सकाळी २ सत्रे आणि सायंकाळी १ सत्र अशा १८ सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायामाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच दि. २१ जून २०१७ च्या जागतिक स्तरावर घेण्यात येणाऱ्या योगा प्रोटोकॉलचा सराव करून घेण्यात आला.

सदर योग सप्ताहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून पतंजली योग समितीचे अॅड. विद्यानंद जोग, श्री. विनय साने, रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे योग प्रशिक्षक श्री. रविभूषण कुमठेकर आणि प्रा. निनाद तेंडूलकर यांनी विविध सत्रांमध्ये योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी नानल गुरुकुल, शिर्के हायस्कूल आणि जी.जी.पी.एस. या शाळांतील योग खेळाडूंनी सहकार्य केले.

हा योग साप्ताह यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शाखांचे उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. योग सप्ताहाचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा. लीना घाडीगावकर, प्रा. निनाद तेंडूलकर, प्रा. ओंकार बाणे, जिमखाना कर्मचारी श्री. महेश खैरे, श्री. आदेश पुसाळकर यांनी मेहनत घेतली.

Comments are closed.