gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मृद चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न

राष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये ‘मृद चाचणी प्रयोगशाळे’च्या माध्यमातून नवीन उपक्रमाचा प्रारंभ होत आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती तपासणी करणे शक्य होणार आहे. मृद चाचणी अंतर्गत मातीतील १२ घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानमध्ये अशा प्रकारच्या सेवा शेतकर्यांना पुरविणे अभिप्रेत आहे. सदर प्रयोगशाळेची नोंदणी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडे झाली आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने या अभियानांतर्गत पुढाकार घेऊन सदर प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन भारतीय कृषी अनुसंधान परिषद, गोवा या केंद्राचे संचालक, डॉ. एकनाथ चाकुरकर यांचे हस्ते आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.