gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा सप्तरंग हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहोळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहोळा ‘सप्तरंग’ विविधरंगी कार्यक्रमांनी नुकताच संपन्न झाला.

क्रीडास्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल असलेला हा सोहोळा याचे एक वार्षिक आकर्षण सर्व कर्मचाऱ्यांना असते. सकाळी आणि दुपारी कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस तसेच मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामद्धे गायन, वादन, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा अशा कार्यक्रमांनी खूप रंगत आणली. याप्रसंगी पुढील वर्षी हे सर्व कार्यक्रम अधिक दर्जेदार व्हावेत असे प्राचार्यांनी सर्वांना आवाहन केले. अल्पोपहाराने या कार्यक्रमाचा समारोप झाला. हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहोळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)