gogate-college
Nature Club

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नेचर क्लब चा वर्धापन दिन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘नेचर क्लब’चा ३५वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ नेचर क्लबच्या श्री. हेमंत खेर यांनी लिहिलेल्या आणि श्री. आनंद पाटणकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताने झाला. नेचर क्लबचे संस्थापक डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी क्लबच्या बदलत्या शैलीचा आढावा घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी नेचर क्लबच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच या क्लबच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या निसर्ग सहली, विविध उपक्रम यांचा आढावा घेतला. उपस्थित अनेक व्यक्तींसाठी हे एक छोटे स्नेहसंमेलनच होते. यावेळी अनेक सहभागी सभासदांपैकी काहींनी आपल्या त्या काळातील अनुभव सांगितले. यामध्ये श्री. मनोहर भगत, श्री. दिनेश किलवे, श्री. श्रीकृष्ण पंडित यांचा प्रामुख्याने समावेश होता.

नेचर क्लबच्या माजी सभासदांपैकी बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दिपक आपटे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यांनी निसर्ग संवर्धन, कोकण, सागरी किनारा आणि रत्नागिरीतील अणुउर्जा प्रकल्प यावर भाष्य केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संध्या सुखटणकर आणि श्री. हेमंत खेर यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (36)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)