gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान परीक्षेचा निकाल दि. १२ जून रोजी; द्वितीय वर्ष प्रवेश दि. १६ जून पासून सुरु

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे वरिष्ठ महाविद्यालय मार्च २०१७ सेमिस्टर ०१ ए.टी.के.टी. आणि सेमिस्टर ०२ रेग्युलर परीक्षेचा निकाल सोमवार दि. १२ जून २०१७ या दिवशी जाहिर करण्यात येईल. प्रथम वर्ष कला, प्रथम वर्ष वाणिज्य, बी.एम.एस. आणि अकौ. फायनान्स या वर्गांचा निकाल सकाळी ११.०० वाजता आणि प्रथम वर्ष विज्ञान , आय.टी., कॉम्पुटर सायन्स आणि बायोटेक या वर्गांचा निकाल दुपारी ०३.०० वाजता जाहिर करण्यात येईल.

द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया दि. १६ ते १९ जून २०१७ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत होईल. प्रवेश अर्जासोबत प्रथम आणि द्वितीय सेमिस्टर मार्कलीस्ट, प्रत्येकी २ झेरॉक्स, आधार कार्ड, जातीचा दाखला प्रत्येकी १ झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.

मंगळवार दि. २० जून २०१७ पासून द्वितीय वर्षाचे महाविद्यालयाचे कामकाज सुरु होईल; याची संबंधित विद्यार्थांनी नोंद घ्यावी; असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)