gogate-college
Gautam Shinde Award

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्री. गौतम शिंदे यांना शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा सहाय्यक श्री. गौतम धुळाजी शिंदे यांना अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचेवतीने दिला जाणारा ‘शिक्षकेतर कर्मचारी भूषण पुरस्कार’ यावर्षी देण्यात आला आहे. मा. रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते के. एम. अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या ३९व्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंग, सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी या सोहोळ्याप्रसंगी उपस्थित होते.

श्री. गौतम शिंदे हे महाविद्यालयात २२ वर्षे सेवेत असून महाविद्यालय आणि जीवशास्त्र विभागातील सर्व शैक्षणिक उपक्रम, कोकण प्रज्ञा शोध परीक्षा, झू जर्नी, स्टडी टूर अशा विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत असतात तसेच संघटनेच्या कार्यामध्येही त्यांचा सहभाग असतो.

या पुरस्काराबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी श्री. शिंदे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)