gogate-college
Ekankika

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एकांकिकेला ‘राज्यस्तरीय पुरस्कार’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘म्याडम’ एकांकिकेला अनेक राज्यस्तरीय एकांकिकेला स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या वोडाफोन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच स्मितल चव्हाण हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. मनोज भिसे आणि प्रथमेश भाटकर यांना दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच उत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
‘आमदार करंडक’ राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत या एकाकांकीकेला चतुर्थ क्रमांक, उत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक स्मितल चव्हाण, विशेष अभिनय पुरस्कार साक्षी कोतवडेकर, दिग्दर्शन तृतीय क्रमांक मनोज भिसे आणि प्रथमेश भाटकर यांना प्राप्त झाला आहे.
पनवेल येथे झालेल्या ‘अटल करंडक’ राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत या एकाकांकीकेला चतुर्थ क्रमांक, उत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक स्मितल चव्हाण, दिग्दर्शन तृतीय क्रमांक मनोज भिसे आणि प्रथमेश भाटकर यांना प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या ‘लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक स्मितल चव्हाण, दिग्दर्शन तृतीय क्रमांक मनोज भिसे आणि प्रथमेश भाटकर यांना प्राप्त झाला आहे.
या एकांकिकेत स्मिताल चव्हाण, गौरी साबळे, साक्षी कोतवडेकर, ऐश्वर्या बापट यांनी भूमिका केल्या आहेत. नेपथ्य राजेश पवार, विशाल कांबळे; संगीत गौराव बंडबे, शुभम बंडबे, अक्षय पेडणेकर, प्रकाशयोजना अक्षय कोळवणकर यांनी केली होती.
या एकांकिकेच्या व्यवस्थापानाची जबाबदारी प्रा. आनंद आंबेकर आणि श्री. प्रसाद गवाणकर यांनी तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. आरती पोटफोडे यांनी काम पाहिले.
श्री. महेश सरदेसाई आणि श्री. विजय गुरव या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘म्याडम’ एकांकिकेच्या राज्यस्तरीय यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)