gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक कर्करोग दिन’ निमित्त डॉ. पेवेकर यांचे व्याख्यान संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक कर्करोग दिन’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे हे कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते. डॉ. पेवेकर यांनी ताणताणाव आणि व्यसनांमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम अनिद त्याचे कार्कारोगामध्ये होणारे रुपांतर यांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. सुखटणकर यांनी ‘भौतिकशास्त्राचे कर्करोग संशोधनातील योगदान’ याविषयी विस्तृत माहिती दिली.

कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालय आणि जीवशास्त्र विभागातील अनेक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स, पोस्टर्स यांच्या माध्यमातून कर्करोगाविषयी माहिती दिली. ज्यामध्ये कर्करोगाचे विविध प्रकार, करणे, उपचार पद्धती यांचा समावेश होता. तसेच विद्यार्थ्यांचे बी.एम.आय., ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन इ. तपासण्यात आले. या कार्यक्रमाच्या भोजन व्यवस्थेचे प्रायोजक श्री. हेरंब जोगळेकर होते. काही विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवल्या होत्या; यातून प्राप्त झालेला निधी कर्करोग सोसायटीस देण्यात येणार आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)