gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘संविधान दिन साप्ताह’ वैविद्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘संविधान दिन साप्ताह’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सप्ताहभर व्याख्यान, ग्रंथप्रदर्शन, विविध स्पर्धा इ. कार्यक्रमांचे आजोजन करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाचे डॉ. मृदुल निळे यांच्या भारतीय राज्यघटनेसंदर्भातील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्रोत्यांना संविधानावरील गीत आणि लघुचित्रफित ‘मेरा मनोगत’ दाखविण्यात आली. रत्नागिरी शहरातील शालेय विद्यार्थ्यांकरिता राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या उपक्रमात अनेक शाळा सहभागी झाल्या. या उपक्रमाचे शाळांच्या मुख्याध्यापकांनी विशेष कौतुक केले. महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात संविधानावरील अनेक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आणि १९४६ ते २६ नोव्हेंबर १९४९ या कालावधीतील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामद्धे वक्तृत्व स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय गट धुंडिराज जोगळेकर, वंशिता अजित भाटकर, ओंकार अंकुश वाळूंज (अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक); प्रश्न मंजुषा स्पर्धा, वरिष्ठ महाविद्यालय गट यामद्धे कुणाल दत्तात्रय कळंबटे, राजदीप चंद्रकांत कदम आणि स्वप्नाली श्रीपत गोताड (अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक); प्रश्न भित्तीपत्रक स्पर्धा, वरिष्ठ महाविद्यालय गट यामद्धे केतकी संभाजी पाटील आणि अक्षय अशोक चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

सप्ताहाचा समारोप महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘संविधान: द मेकिंग कॉन्स्टीट्युशन ऑफ द इंडिया’ लघुपट दाखवून करण्यात आला. याप्रसंगी वसतिगृहाचे अधीक्षक प्रा. प्रभात कोकजे उपस्थित होते.

‘संविधान दिन साप्ताह’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झाले. कला शाखा, वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखेचे उपप्राचार्य अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे आणि डॉ. मिलिंद गोरे, प्रा. निलेश पाटील, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी  आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

h
h
h
political1
Comments are closed.