gogate-college-autonomous-logo

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे अविष्कार संस्थेस संगणक सॉफ्टवेअर प्रदान

computer-software-provided-to-avishkar-institute

सामाजिक दायित्वाप्रती जागृत व कार्यरत राहणाऱ्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘अविष्कार’ या संस्थेस संगणक सॉफ्टवेअर मुंबई विद्यापीठाचे मान. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचे हस्ते संस्था कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. अविष्कार संस्थेच्यावतीने व्यवस्थापकिय अधिक्षक श्री. सचिन वायंगणकर व कार्यकारिणी सदस्या डॉ. मनीषा वंडकर यांनी हे संगणक सॉफ्टवेअर स्विकारले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाद्वारेनिर्मित या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या अविष्कार या विशेष मुलांच्या संस्थेस मुलांची नोंदणी, पुनर्वसित विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ठेवणे व गरजेप्रमाणे उपलब्ध करून देणे, फोटो आणि सही यांची साठवणूक करणे, परीक्षा विभाग हाताळणी करणे, परीक्षांची माहिती साठवणे व त्यावरून विद्यार्थ्यांची प्रगती ठरविणे अशाप्रकारच्या संस्थेच्या बहुउद्देशीय कामांची क्षमता वाढणार आहे. सदर सॉफ्टवेअर संचलनास अतिशय सुलभ असून त्याचा लाभ अविष्कार संस्थेस विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी उपयुक्त साधन म्हणून करता येणार आहे.

या सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील चेतन गोरे आणि अथर्व देवस्थळी या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनुजा घारपुरे आणि प्रा. प्रशांत लोंढे यांनी मार्गदर्शन केले.

Comments are closed.