gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कम अॅड लर्न फिजिक्स उपक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्रातील काही मुलभूत संकल्पनांशी संबंधित प्रयोगांचे प्रदर्शन दि. १२ मार्च २०१८ रोजी आयोजित करण्यात आले होते. ‘कम अॅड लर्न फिजिक्स’ या उपक्रमांतर्गत इ. ९ वीच्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त माहिती देणारे विविध प्रयोग यामद्धे मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचा जीजीपिएस आणि शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. महाविद्यालयातील पदवी विभागातील विद्यार्थ्यांनी सदर प्रयोगांची मांडणी केली व शालेय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यातील वैज्ञानिक तत्वे समजवून सांगितली.

बहुख्येने विद्यार्थ्यांनी प्रदर्षनामद्धे उत्साहपूर्ण सहभाग दर्शविला. या प्रदर्शनाला भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेश बेळेकर आणि प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)