gogate-college-autonomous-logo

जात पडताळणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात

‘जात पडताळणी प्रमाणपत्र’ वितरण समारंभ संपन्न

 

विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कमिटी, क्र. २, रत्नागिरी यांचेमार्फत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच “सहज-सोपी जात पडताळणी” शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या या शिबिरासाठी मा. उपायुक्त श्री. प्रमोद जाधव, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, क्र. २, रत्नागिरी; शास्त्र विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, पर्यवेक्षिका सौ. विशाखा सकपाळ हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ लिपिक श्री. सचिन पेडणेकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. नानासाहेब हाके यांनी केले. सदर उपक्रमाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

यावेळी सुमारे १११ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ तर्फे विदयार्थी हिताच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातच प्रमाणपत्रे देण्याची घटना प्रथम घडत आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमाकरिता लाभार्थी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.