gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘प्रसारमाध्यमांतील रोजगार संधी’ विषयी मार्गदर्शन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे विभागाच्या माजी विद्यार्थिनी आणि सध्या बोनिमॉथ युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथे पत्रकारिता या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. ग्लोरिया खामकर यांचे ‘प्रसारमाध्यमांतील रोजगार संधी’ या विषयावरील व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. झी न्यूज, फ्रिलान्स रेडिओ निर्मिती, कम्युनिटी रेडिओ या क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. इंग्लंडमधील ब्रिटिश एशियन रेडिओ या संदर्भातील त्यांच्या संशोधनाला पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे.

‘प्रसारमाध्यमांतील रोजगार संधी’विषयी बोलताना त्यांनी पत्रकार या संधीव्यतिरिक्त संशोधन, एडिटिंग, फ्रीलान्सिंग पत्रकारिता इ. संधींचा उल्लेख केला. या क्षेत्रात प्रभावी कामगिरीकरिता सतत वाचन, उत्तम श्रोता असणे, चांगला जनसंपर्क ठेवणे, सातत्याने नवीन शिकत राहणे या बाबी आवश्यक आहेत. तुमचे करिअर घडवण्यासाठी तुमच्या अंतर्मनाचा आवाज ओळखा, जे क्षेत्र मानपरून आवडतं तेच निवडा’ असा सल्ला त्यानी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुरा दाते यांनी केले. या व्याख्यानाला विभागातील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

Seminar
Seminar
Comments are closed.