gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आय.सी.आय.सी.आय. बँकेचे कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे बुधवार दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या मुंबईस्थित शाखांमधील ‘सेल्स ऑफिसर’ पदांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या पदांकरिता महाविद्यालयातून कला, वाणिज्य अथवा विज्ञान यांपैकी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. वयवर्ष २६ पेक्षा कमी असलेले विद्यार्थी याकरिता पात्र ठरतील. निवड प्रक्रियेमद्धे लँग्वेज प्रोफिसियन्सी टेस्ट, ऑनलाईन असेसमेंट आणि पर्सनल इंटरव्ह्यू अशा टप्यामधून अंतिम निवड केली जाणार आहे.

अधिक माहितीकरिता डॉ. उमेश संकपाळ ९७६४४१४६१२ आणि प्रा. रुपेश सावंत ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा. तसेच आपल्या मुळ कागदपत्रांसह महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत ‘सेमिनार हॉल’मध्ये उपस्थित राहावे आणि या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)