gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बीएस्सीच्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून पुणेस्थित कॉर्निंग टेक्नोलॉजी (इंडिया) प्रा. लि. या फायबर ऑप्टीकलच्या उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित कंपनीच्या मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएट्स (ऑपरेशन्स) या पदांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. हे इंटरव्ह्यू गुरुवार दि. २७ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये घेतले जातील. याकरिता बी.एस्सी.ला फिजिक्स, मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री हे स्पेशलायझेशन घेऊन २०१६ला उत्तीर्ण झालेले तसेच २०१७ ला तृतीय वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. महाविद्यालयातर्फे ही संधी नजीकच्या इतर महाविद्यालयातील पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे डॉ. उमेश संकपाळ ९७६४४१४६१२ आणि प्रा. रुपेश सावंत ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा; असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)